Shrimant Dagdusheth Ganpati: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास.... - Shrimant Dagdusheth Ganpati
पुणे: चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असते. या फुलांमध्ये एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक आज पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती करण्यात आला. यावेळी मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिरात सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी होती. मंदिरास 21 हजार फुलांची आरास करण्यात आली आहे. या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ आणि केवळ सजावटीसाठीच केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग हा गडद पिवळा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक आहेत. शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये फुले व्यवस्थित राहतात. याबाबत ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज सूर्यफूल महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या चैत्र महिना असून वसंताला बहार आलेली आहे. या ऋतूत निसर्गात विविध फुलांची उधळण होत असते. याच रंगबेरंगी सुहासी फुलांचे अर्घ्य आज बाप्पाच्या चरणी सूर्य फुलाच्या माध्यमातून अर्पण करण्यात आले आहे. सकाळपासूनच या फुलांची आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी दिसून आली.