CM Nitish Kumar: लालू प्रसाद यादव बिहारमध्ये दाखल! मुख्यमंत्री म्हणाले, लवकरच विरोधी पक्षांची संयुक्त बैठक होणार - बिहारमध्ये विरोधी ऐक्याबाबत बैठक होणार आहे
पाटणा (बिहार) :राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे उपचारानंतर आज बिहारमध्ये दाखल झाले आहेच. त्यानंतर आता महाआघाडीत 2024 च्या राजकीय लढाईला मोठी धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राबरी यांच्या निवासस्थानी जाऊन लालूंची विचारपूस केली. त्यानंतर बिहारमधील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी लालू यादव हे महाआघाडीचे संचालक असतील, असे स्पष्टपणे सांगितले असले तरी त्यांच्या येण्याने काही फरक पडणार असही ते म्हणाले होते. परंतु, लालू यांच्या येण्याचे महाआघाडीत उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तर दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, बिहारमध्येही बैठक घेण्याबाबत चर्चा आहे. सर्व, लोकांसोबत बसून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले आहेत.