महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : महाराष्ट्र सरकार शिवप्रताप दिनाच्या तारीख - तिथीचा वाद का निर्माण करत आहे ? संभाजी ब्रिगेडचा सवाल - Sambhaji Brigade

By

Published : Nov 29, 2022, 7:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला. छत्रपतींना संपवण्यासाठी आलेल्या अफजल खान आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच ठिकाणी संपवलं, हा शौर्याचा इतिहास आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सुद्धा 363 वा 'शिवप्रताप दिन' 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला. याच दिवशी प्रतापगडावरच अफजल खानाच्या कबरीवरचा सुद्धा अतिक्रमण काढून टाकलं. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि इतर मंत्री मंडळातील सहकारी तिथीनुसार शिवप्रताप दिन का साजरा करत आहेत ? हा तारीख तिथीचा वाद सरकारच अधिकृत निर्माण करणार असेल तर हा खोटारडेपणा शिवद्रोहीपणा आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. अस संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details