Dead Body On Bike : अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं भावानं दुचाकीवरून घरी नेला बहिणीचा मृतदेह! पाहा Viral video - दुचाकीवरून घरी नेला बहिणीचा मृतदेह
Published : Nov 8, 2023, 6:08 PM IST
औरैया (उत्तर प्रदेश) Dead Body On Bike :उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं एक भाऊ आपल्या बहिणीचा मृतदेह चक्क दुचाकीवरून घरी घेऊन जाताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हे संपूर्ण प्रकरण औरैया जिल्ह्यातील बिधुना इथलं आहे. येथे बुधवारी एका २० वर्षीय तरुणीला इलेक्ट्रिक रॉडचा शॉक लागला. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी तात्काळ दुचाकीवरून हॉस्पिटल गाठलं. मात्र तेथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर तरुणीच्या भावानं मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालयात अॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्र हॉस्पिटलमध्ये अॅम्ब्युलन्सच उपलब्ध नव्हती. त्यामुळे तरुणीच्या भावाला नाईलाजानं मृतदेह दुचाकीवरून घरी न्यावा लागला. तेथे उपस्थित असलेल्या कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. 'ईटीव्ही भारत' या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.