महाराष्ट्र

maharashtra

नृसिंहवाडी

ETV Bharat / videos

दिगंबराच्या जयघोषात दुमदुमली नृसिंहवाडी, पहा व्हिडिओ - Datta Jayanti in kolhapur

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 1:23 PM IST

Updated : Dec 26, 2023, 2:32 PM IST

कोल्हापूर :  दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होत आहे. पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झालेत. मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याच पहायला मिळाल. तर श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे. तरी जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीचा सोहळानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातील हजारो भाविकांनी दत्त दर्शनासाठी या पवित्रक्षेत्री हजेरी लावतात. श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार श्री नृसिंह-सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या दहा दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्यानं पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता. अवघी नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीेने फुलली आहे.  

Last Updated : Dec 26, 2023, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details