महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

dalit student beat up : युपीत दलित विद्यार्थ्याला 6 गुंडांकडून मारहाण; पायही चाटायला लावले! - Video of Dalit student beating viral

By

Published : Apr 19, 2022, 7:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

रायबरेली ( लखनौ ) - उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर ( Video of Dalit student beating viral ) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याला गुंडांकडून बेदम मारहाण ( Dalit student beaten by goons ) केली जात आहे. त्यानंतर हे गुंड पीडित विद्यार्थ्याला पाय चाटायला लावताना दिसत आहेत. या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच ( Dalit student UP viral video ) एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ३ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आरोपीनेच व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध ( student beat by belt ) घेत आहेत. पीडित विद्यार्थ्याची आई गुंडांच्या शेतात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details