तुम्हा बघून काळीज... लावणीच्या कार्यक्रमात शाळेच्या छतावर प्रेक्षकांचा धुडगूस - Crowds of spectators on roof
मिरज तालुक्यातील बेडग येथे एका सत्कार कार्यक्रमावेळी इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या ( Instastar Gautami Patil ) लावणी दरम्यान प्रेक्षकांनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडला आहे. उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरशः शाळेच्या छतावर थिरकले त्यामुळे चुराडा झाला. तसेच झाडाच्या फांद्याही बसून मोडून टाकल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात आयोजित लावणी कार्यक्रम प्रसंगी अमाप गर्दी जमली होती. बेडग येथील एका मंडळाच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या व बेडग गावचे नाव देशात गाजविणाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सोशल मीडियावरील इंस्टास्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित ( Dance program organized ) करण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नृत्य पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले होते. यामुळे शाळेच्या पटांगण भरून गेले होते. यावेळी उत्साही प्रेक्षकांनी छतावरचं नृत्याचा ठेका धरला. ज्यामध्ये कौलांचा चुराडा झाला. यामुळे तार जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST