महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gold purchase in Jalgaon Market : अक्षय्य तृतीया निमित्ताने जळगावच्या बाजारात सोने खरेदीकरिता गर्दी - अक्षय्य तृतीया सोने खरेदी न्यूज

By

Published : May 3, 2022, 9:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

जळगाव- अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक प्रमुख मुहूर्त मानला ( Akshayya Tritiya celebration in Jalgaon ) जातो. खान्देशात सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. आज यानिमित्ताने शुभ कार्य करीत हा मुहूर्त साजरा करत असतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागरिकांना सोने खरेदी ही करता येऊ शकली नव्हती. मात्र आज अक्षय्य तृतीयाच्या महूर्त साधत नागरिकांनी जळगावच्या बाजारात सोने खरेदी साठी मोठया प्रमाणात ( gold buy on Akshayya Tritiya ) गर्दी केली. आजच्या सोन्याचे भाव प्रति तोळा 51500 इतके ( gold rates in Jalgaon market ) आहेत. तर चांदीचे 1 किलोचे दर 6695 इतका आहे. सुवर्णबाजार साेमवारी मात्र, 400 रुपयांची घसरण हाेऊन भाव 51 हजार 950 रुपयांवर आले. दरम्यान, आगामी आठवडाभर हे दर असेच (राेज 300 ते 400 रुपये) वाढत राहिले तर ते दर 55 हजारांचा टप्पा गाठतील,अशी शक्यता सुवर्णपेठेतील जाणकारांनी वर्तवली आहे. सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात आज सोने खरेदी साठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून मिळाली आहे. अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले साेने अक्षय संचय राहून वाढत जाते असा समज आहे. या मुहूर्तावर साेने खरेदीला वेगळे महत्त्व मानले जाते. मंगळवारी सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ हाेऊन साेने 52 हजार 350 रुपये प्रतिताेळा झाले हाेते. ते मंगळवारी पुन्हा 400 रुपयांनी घसरून 51 हजार 950 रुपये झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details