Sachin Tendulkar Made Laddu : संक्रांतिनिमित्त सचिन तेंडुलकरने बनवले तिळाचे लाडू, पाहा व्हिडिओ - सचिन तेंडुलकर
मुंबई संपूर्ण देशात मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. मकर संक्रातीला सर्व मराठी घरात तीळ आणि गुळाचे लाडू बनवून सर्व मित्र परिवारांना नातेवाईकांना 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' असा आपुलकीचा आणि प्रेमाचा संदेश दिला जातो. हात संदेश मराठमोळा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सर्व देशवासीयांना दिला आहे. मात्र या संदेशासोबतच प्रत्येक मराठी घरामध्ये ज्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवले जातात, त्या पद्धतीने सचिन तेंडुलकरने स्वतः तिळगुळाचे लाडू बनवले आहेत. तिळगुळ बनवण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. तिळगुळाचे लाडू बनवण्याचा व्हिडिओ स्वतः सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करत सर्व देशवासीयांना मकर संक्रांतीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. तिळाचे लाडू बनवण्याचे सर्व साहित्य सचिन तेंडुलकरने घेऊन स्वतः ते तिळाचे लाडू वळले आहेत. तिळगुळ बनवण्याचा गोड असा अनुभव सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मासे पकडण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तिळाच्या लाडूची रेसिपी थंडीच्या मोसमात केली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खूप आवडते. याचे कारण हे देखील आहे की, या लाडूंची चव नेहमीच चांगली असते. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू बनवतात. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. तसेच हिवाळ्यात तीळ खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामुळे शरीराला ऊब मिळते आणि ऊर्जा मिळते. प्राचीन काळापासून ते हिवाळ्यात बनवण्याचे कारण आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर हा नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेला पाहायला मिळतो. दिवसभरातील अनेक रंजक किस्से किंवा अनुभव तो व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी गोव्याला फिरण्यासाठी गेले असता, मासे पकडण्याचा अनुभव देखील सचिन तेंडुलकरने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी शेअर केला होता. सचिनने टपरीवर चहा आणि टोस्ट खाण्याचा अनुभव शेअर केला होता. एका ठिकाणी जात असताना रस्त्यावर थांबून अगदी साध्या टपरीवर सचिन तेंडुलकर याने चहा आणि टोस्ट खाण्याचा अनुभव देखील आपल्या चाहत्यांसोबत व्हिडिओ द्वारे सांगितला होता. त्याच्या या अशा वेगवेगळ्या आणि भन्नाट व्हिडिओला चाहत्यांचा देखील तेवढाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर याने केलेल्या तिळगुळाच्या लाडूचा व्हिडिओला देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केला आहे.