माजी सैनिकाकडून विश्वचषकासाठी भारतीय संघाला शुभेच्छा अन् जोरदार घोषणाबाजी; पाहा व्हिडिओ - Cricket world cup final highlights
Published : Nov 19, 2023, 11:53 AM IST
पुणे Cricket World Cup Final 2023 :आज (19 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना असून हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. सामन्यापूर्वी देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. देशभरातून नागरिक, शेतकरी, सैनिक सर्वजण भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. पुण्यातील माजी सैनिक सुद्धा आता शुभेच्छा देण्यासाठी उत्साहामध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी जितेगा भाई जितेगा भारत जितेगा अशा घोषणा देऊन भारत वर्ल्ड कपच्या अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. तसंच आजची मॅच भारतच जिंकणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केलायं. इतकच नाही तर त्यांनी यावेळी डान्स केला. दरम्यान, पुण्यातील या माजी सैनिकांचा घोषणाबाजी करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच आज वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय संघाला विविध प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत.