महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेटर विराट कोहली

ETV Bharat / videos

Virat Kohli Birthday : क्रिकेटर विराट कोहलीला ठाण्यातील चाहत्यांच्या अनोख्या शुभेच्छा; रांगोळीत रेखाटले पोर्ट्रेट

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 9:09 PM IST

ठाणे Virat Kohli Birthday :एकीकडे क्रिकेट विश्वकप (Cricket World Cup 2023) सुरू आहे. दुसरीकडे क्रिकेटर विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त (Virat Kohli Birthday) आयुष हॉस्पिटल, कॉम्प्लेक्स वेद आर्ट अकॅडमी राधानगर कल्याण पश्चिम येथे रांगोळी पोर्ट्रेट रेखाटून चाहत्यांनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे रविवारी विराटने कोलकाता येथील मैदानात शतक ठोकल्यानं चाहत्यांना त्याने शतकी खेळी करून भेट दिली. कल्याण पश्चिम भागात राहणारे यश महाजन हे कला शिक्षक आहेत. त्यांनी काही विद्यार्थीसह विराटचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. विशेष म्हणजे सोमवारी, सहा नोव्हेंबरला महाजन यांचाही वाढदिवस आहे. हाच योग साधून त्यांनी विराट कोहलीला रांगोळीच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. लतिका शेट्टी, मुद्रा झुंजारराव, मंजीरी निकम, अनुष्का जाधव, वेद महाजन इत्यादी विद्यार्थी व भावना कला शिक्षिका महाजन देढिया, यांनी त्यांना मदत केली.  

ABOUT THE AUTHOR

...view details