महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 30, 2022, 7:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ETV Bharat / videos

Convocation Ceremony : शिस्तबद्ध संचलनाने एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला

पुणे डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण, येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास, लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा, विजय भारत, सारे जहा से अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 143 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा convocation ceremony of 143rd batch of National Defense Prabodhini उत्साही वातावरणात नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार Chief of Naval Staff Admiral R Hari Kumar यांच्या उपस्थितीत पार पडला. पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील 'क्वाटर डेक'चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी नौदलप्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांनी सोहळ्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details