Pilibhit : रंग लावल्यावरून वाद! शीख तरुणाला मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल - पीलीभीत में सिख युवक को पीटा
उत्तर प्रदेश : होळीच्या सणाला जबरदस्तीने रंग लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणांनी जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शीख तरुणांनी तलवार बाहेर काढली. दरमयान, यामध्ये या तरुणांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या फुटेजच्या आधारे पिलीभीत पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोमवारी रात्री उशिरा पुरणपूर पोलीस स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. हा व्हिडिओ होळीच्या दिवसाचा आहे. त्यात काही लोकांची गर्दी असते. यामध्ये रंग लावण्यावरून वादंग होत तरुणांवर हल्ला करण्यात आला असे दिसत आहे.