Ulhas Bapat Reaction : आता जे कोर्टाने सांगितले ते योग्यच आहे - घटनातज्ज्ञ उल्हास बापट - Chief Justice N S V Ramana
पुणे : राज्याच्या राजकारणात शिंदेंच्या बंडानंतर मोठी उलथापालथ होऊन शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसून फुटलेले आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजप मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. आता बंडखोर आमदारांवर शिवसेने कारवाई करण्याचा बडगा उचलला आणि 16 आमदारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची याचिका दाखल केली. याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा ( 16 Rebel MLAs Get temporary relief ) मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा ( Chief Justice N.S. V. Ramana ) यांनी विधानसभा अध्यक्षांना केल्या आहेत. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST