Jayakumar Gore साताऱ्यातील कॉंग्रेसच्या दिग्गजांचा शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश; जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Jayakumar Gore सातारा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना साताऱ्यातील कॉंग्रेसचे काही दिग्गज भाजपच्या गळाला लागले आहेत. शुक्रवारी (दि. ११) ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे MLA Jayakumar Gore यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. साताऱ्यात कॉंग्रेसला खिंडार पडला आहे. सातारा जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर देखील जिल्ह्याने दोन्ही कॉंग्रेस आणि पुरोगामी विचारांची पाठराखण केली. मात्र, मागील 10 वर्षांपासून कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपली पाळेमुळे रोवायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना गळाला लावले. आता भाजप अधिकच सक्रीय झाला असून कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे आजी- माजी पदाधिकारी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST