महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Congress protest against inflation - पुण्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी - पुणे येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Aug 5, 2022, 12:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

पुणे - बहुत हुई महंगाई की मार..अबकी बार...अशी खोटी आश्वासन देत सत्तेत ( Congress protest against inflation in pune ) आलेल्या मोदी सरकारमुळे सामान्य माणसाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळणे कठीण झाले आहे. संपूर्ण भारतभर जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे, असे सांगत महागाई तसेच जीवनावश्यक वस्तूंवर ( Inflation in Pune ) लावण्यात आलेल्या जीएसटीच्या विरोधात ( GST increase oppose by Congress ) आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा या सर्वांचे भाव वाढलेले आहे. सातत्याने केंद्र सरकार हे जीवनावश्यक वस्तू, तसेच पेट्रोल - डिझेल आणि सीएनजीच्या दरामधे वाढ करत आहे. या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे, असे असताना देखील महागाई काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. हेच का तुमचे अच्छे दिन, असे म्हणत येणाऱ्या काळात महागाई जर कमी झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला. या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details