Congress protest in Chandrapur : सोनिया गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे चंद्रपूरमध्ये आंदोलन
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीची नोटीस बजावली. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते (Congress movement) मोदी सरकारविरोधात (Modi Government) आक्रमक झाले आहेत. प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहे. विरोधकांना संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करू लागले आहे. यातून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोदी सरकारविरोधात संपात व्यक्त होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाने याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार विभागीयस्तरावरील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST