पृथ्वीराज चव्हाणांनी भारतीय प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल दिली 'ही' धक्कादायक माहिती
Published : Jan 7, 2024, 11:01 PM IST
सातारा Prithviraj Chavan News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात (Patrakar Din) बोलताना, भारतीय प्रसार माध्यमांच्या (Indian Media) स्वातंत्र्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा नंबर पहिल्या शंभरमध्ये नाही. भारतात पुर्वीसारखी लोकशाही राहिली नसून भारतीय प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य कमी व्हायला लागल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय पाहणी करणार्या संस्थांच्या अहवालातून समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिल्यानं निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. प्रसार माध्यमांसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळं पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय नव्या युगात टिकाव लागणार नाही. अनेक देशांमध्ये सरकारी मालकीची वृत्तपत्रे आहेत. मात्र, भारतात तसे वृत्तपत्र नाही. आज स्वतंत्र पत्रकारिता शिल्लक राहिली नाही तर भविष्यात पेड एजन्सी निर्माण होतील, अशी भीती देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलीय.