Girish Koli: शिंदे गटाकडून काँग्रेस पदाधिकारी गिरीश कोळी यांना चोप, म्हणाले, अशा हल्ल्यांना... - जितेंद्र आव्हाड
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस ठाणे प्रवक्ते गिरीश कोळी यांना चोप दिला आहे. बंटी बाडकर व त्यांचे सहकारी यांनी गिरीश कोळी यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले की, हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड आहे. मग पोलीस छळणार स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार जेलमध्ये त्यांना सडवणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. तर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यानी संदर्भामध्ये पोलीसांकडे दाद मागितली आहे. पोलीसांवर दबाव असल्याचा आरोपही यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य मनोज शिंदे यांनी केला आहे. मारहाण करणे हे कायद्याचे भंग आहे. एवढी गंभीर मारहाण होऊन देखील गुन्हा दाखल होत नसल्यामुळे यासाठी पुढे कायदेशीर मार्गाने दाद मागितली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. गिरीश कोळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी त्यानी सांगितले की, बुधवारी रात्री कोपरीत त्यांना अडवून साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो, त्यांना बदमान का करतो, असे म्हणत पोस्ट डीलीट करण्यास सांगितले व मारहाण केली. त्यानंतर कोळी यांनी ती पोस्ट डीलीट केली. पुढे ते म्हणाले, ती पोस्ट राजकिय नव्हती. साहेबांच नाव घेतल नाही. पोस्ट मध्ये कोणत्याही राजकिय व्यक्तीच नाव नाही. मी फक्त भावना व्यक्त केली. अशा हल्लांना आम्ही घाबरत नाही असे गिरीश कोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.