Ashok Chavan on Heatstroke Death Case : खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, अशोक चव्हाण यांची मागणी - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा
नांदेड - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेबाबत एक दिवसीय अधिवेशन बोलवण्यात यावे आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. अशोक चव्हाण यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्याबाबतही साशंकता व्यक्त केली आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. महाविकास आघाडी व्हावी ही तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची इच्छा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा द्यायच्या हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आघाडी ही प्रक्रिया आहे. यासाठी थोडा वेळ लागणार, मात्र आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न राहील, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या आघाडीवरील वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.