महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुण्यात विद्यार्थी काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात भोंगा आंदोलन

By

Published : Apr 18, 2022, 6:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पुणे - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरोरोज वाढ होत ( Fuel rate Hikes in Pune ) आहे. याविरोधात महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावर भोंगा लावून इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात ( Congress Agitation with Loudspeaker ) आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ झाली की नाही, याबाबत केलेली विचारणा व व क्या हुआ तेरा वादा हे गाणं भोंग्या वर लावण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे म्हणाले, सध्या राज्यात भोंग्याचे राजकारण सुरू आहे. काही पक्ष मुळ मुद्द्यांना सोडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भोंगा लावून हे आंदोलन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details