महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

161 feet tall Anjaneya statue : कर्नाटकमध्ये उभारण्यात आला 161 फूट उंच अंजनेय पुतळा; बसवराज बोम्माई यांच्याकडून अनावरण - बसवराज बोम्माई अंजनेय पुतळा अनावरण

By

Published : Apr 11, 2022, 7:39 PM IST

बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी कुनिगल तालुक्यातील बिडनागेरे येथे १६१ फूट उंच पंचमुखी अंजनेय पुतळ्याचे अनावरण ( Basavaraj Bommai unveils Anjaneya statue ) केले. बिडनागेरे बसवेश्वर मठाने ही ( Bidanagere Basaveshwara Math ) मूर्ती बसवली आहे. पंचमुखी अंजनेय पुतळ्याच्या अनावरणानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai Ram Navami celebration ) म्हणाले, की राज्यासाठी पुढे चांगला काळ असेल. राज्यात रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अनेक पवित्र कार्ये हाती घेतली जात आहेत. बोम्मई म्हणाले की, येत्या काही दिवसांत या प्रदेशात मोठी घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पंचमुखी अंजनेय हे हनुमानाचे ( tallest statue of Panchamukhi Anjaneya ) विशेष रूप आहे. त्याचा रामायणात उल्लेख आहे. हनुमानाने हे रूप जगाच्या कल्याणासाठी धारण केले आहे. हनुमानाची 161 फूट उंच मूर्ती कर्नाटकात बसवावी, ही ईश्वरी इच्छा आहे. शिल्पकारांनी अप्रतिम काम केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी नांजवधूत स्वामीजी, हरिहर वीरशैव पंचमसाली पीठ वीर वचनानंद स्वामीजी आणि इतर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details