Shinde Vs Thackeray group दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा, पहा व्हिडिओ - एकनाथ शिंदे गट
एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी दापोलीच्या सभेत (Dapoli) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये वातावरण तापलेलं आहे. आज दापोलीमध्ये शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि ठाकरे गटामध्ये (Uddhav Thackeray Group) राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ठाकरे गटाकडून रामदास कदम यांचा निषेध सुरु होता. त्याचवेळी शिंदे समर्थक त्या ठिकाणी आले आणि दोन्ही गटात राडा (Rada between Shinde and Thackeray group) झाला. शिंदे गटाकडून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST