Pune news : गाडी बाजूला घे म्हणत पोलिसाला मारहाण; पहा सीसीटिव्ही - Beating the policeman in pune
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील धानोरी येथे भर रस्त्यात पोलीस आणि चार ते पाच जणांमध्ये हाणामारी ( Clash between police and four to five persons ) झाली आहे. हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद ( captured in CCTV ) झाला आहे. धानोरी परिसरात रस्त्यावरच पोलीस प्रदीप मोटे यांनी गाडी उभी केली होती. त्यावेळेस कालिदास खांदवे यांनी गाडी बाजूला घे म्हणून मोटे यांना सांगितले. मोटे यांना खांदवे यांनी मारहाण केली आणि त्यानंतर पाच ते सहा जणांनी मिळून पोलीस प्रदीप मोटे यांना वीटाने मारहाण केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी कालिदास खांदवे यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी मारहाण करणारे सर्व आरोपी हे फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST