महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

श्रीकृष्णाच्या मूर्तीसह ताजमहालमध्ये जाणाऱ्या पर्यटकास सीआयएसएफने अडवले - श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन ताजमहालमध्ये

By

Published : Aug 30, 2022, 10:13 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

आग्रा श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन ताजमहालमध्ये प्रवेश करणाऱ्या एका पर्यटकाला सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी अडवले cisf bans tourist entry in taj mahal . ताजमहाल पाहण्यासाठी हे पर्यटक राजस्थानच्या जयपूर येथून आले होते. ताजमहालच्या पश्चिमेकडील दरवाजातून एक पर्यटक हातात गोपाळ कृष्णाची मूर्ती घेऊन आत शिरू लागला entry in taj mahal with idol of god shri krishna. त्याचवेळी सीआयएसएफने नियमांचे कारण देत त्याच्या प्रवेशावर बंदी घातली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यावर राष्ट्रीय हिंदू परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पराशर यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास ताजमहाल संकुलात उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रकरणी हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट यांचे वक्तव्यही आले आहे. सीआयएसएफ वारंवार हिंदूंचा अपमान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीआयएसएफच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हेही वाचा Kamal Rashid Khan arrest बेताल ट्विट भोवले, कमाल खानला मालाड पोलिसांनी केली अटक
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details