Chitra Wagh : चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद सुरु असतानाचं शेकडो महिलांची जेवणासाठी झुंबड - hundreds of women gathered for lunch
भाजपच्या महिला मेळाव्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ भिवंडीत आल्या असताना, त्यांनी 18 वर्षाच्या खालील मुलींना पळवून नेल जातं आहे, लग्नाचे आमिष दाखवले जातं आहे, फूस लावली जात आहे, मात्र अशा वेळी मुलींसह त्यांच्या परिवाराला कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश मधील लव्ह जिहाद सारखा कायदा आपल्या महाराष्ट्रात हवा आहे. अशी मागणी शिंदे आणि फडणवीस सरकारकडे करीत असल्याचे वाघ यांनी सांगितले. दुसरीकडे चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद सुरू असताना महिलांची जेवणासाठी झुंबड उडाल्याने केटरर्स व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिलांची गर्दी आवरता- आवरता चांगलीच दमछाक झाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST