Video: पुण्यात मुलं पळवणारी टोळी? काय आहे सत्य? पोलीस म्हणाले..
पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे सध्या मोठ्या प्रमाणावर मॅसेज व्हायरल (child abduction viral message Pune) होत आहे. विशेषतः पुण्यातील कोंढवा परिसरात ही टोळी सक्रिय (child abduction gang kondhwa) असल्याचे मॅसेज आणि व्हिडियो देखील व्हायरल होत आहेत. अनेक शाळांनी पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station) येथे अर्ज देखील दिलेले आहेत. तसेच काल कोंढवा येथून 3 मुलांचे अपहरण झाल्याचं मॅसेज (child abduction fake message viral) देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, अशी कोणतीही टोळी सक्रिय नसून या सर्व अफवा असल्याचं पाटील म्हणाले. याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्याशी बातचीत केलीय.पाहूया... (Pune Police on child abduction gang rumour)
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST