महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोसेखुर्द धरणाला भेट - Eknath Shinde Gose Dam

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Nov 12, 2022, 7:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

भंडारा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी गोसे धरणाला भेट Eknath Shinde visit to Gose Dam दिली आहे. सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या धरणावर भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने गोसेखुर्द जल पर्यटन केले जाणार आहे याची पाहणी आणि सादरीकरणासाठी ते उपस्थित होते. तसेच गोसे धरणाची पाहणी त्यांनी यावेळी केली. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र भोंडेकर, खासदार सुनील मेंढे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह चर्चा करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, प्रकल्पाचा पूर्व विदर्भाला मोठा लाभ मिळेल. या प्रकल्पामुळे 700 गावे ओलीताखाली येतील आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आव्हाडांना अटक ही पोलिसांची कायदेशीर कारवाई असून राजकीय सूड नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकार सर्वांच्या हितासाठी काम करीत आहे, असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details