CM Took Darshan Of Dagdusheth Halwai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन - शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज बुधवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी श्री गजाननाची आरती केली. यावेळी कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त हेमंत रासने, बाळासाहेब परांजपे, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST