Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक इंच जरी हाटला तरी आत्मदहन करू; सांगलीत संतप्त शिवप्रेमींचा इशारा... - सांगली शिवाजी महाराजांचा पुतळा
सांगली जिल्ह्यात आष्टा शहरात गेल्या 11 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj effigy) बसवण्याची मागणी आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आले आहे. त्यामुळे आता गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj effigy) बसवला आहे, मात्र तो प्रशासनाकडून हटवण्याचा प्रयत्न झाल्यास आत्मदहन करू,असा इशारा शिवप्रेमींनी (Warning of Shiva lovers in Sangli) दिला आहे. इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली समस्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे आणि तातडीने या पुतळ्यासाठी जागा हस्तांतर करावी, अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाआरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST