
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटलांना भेटणार नाही, पण...- छगन भुजबळ - Chhagan Bhujbal Reaction

Published : Nov 5, 2023, 8:40 PM IST
छत्रपती संभाजीनगर Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी रुग्णालयात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तर मी मनोज जरांगे पाटील यांना (Manoj Jarange Patil) भेटायला जाणार नाही. ते आता बरे आहेत, डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. ते लवकर बरे व्हावे अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असं मत राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलं. तसेच सुभाष राऊत माझे समर्थक होते आणि आहेत, जयदत्त अण्णा हे देखील माझे खास मित्र आहेत. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. संदीप क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. प्रकाश सोळंके देखील राष्ट्रवादीचेच आमचे आमदार आहेत. आंदोलनामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असं म्हणतात. असं भुजबळ म्हणाले.