महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shivaji Maharaj Statue Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; पोलिसांची आंदोलकांबरोबर झटापट

By

Published : Jan 3, 2023, 10:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

सांगली : आष्ट्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद आता पुन्हा पेटला ( Chatrapati Shivaji Maharajs Statue Controversy ) आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Clashes Between Police Protesters ) हटवण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी आष्टामधल्या ( Shivaji Maharajs Statue Controversy Rages in Sangli ) सांगली-इस्लामपूर रस्त्यावर ठिय्या मारत 'रास्ता रोको' सुरू केला. भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवप्रेमींनी रस्त्यावर ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना हुसकावून लावले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यामध्ये झटापट आणि लाठीचार्जचादेखील प्रकार घडला आहे. पोलिसांनी हा 'रस्ता रोको' मोडीत काढत आंदोलकांना ताब्यात घेतला आहे. यामध्ये भाजपाचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटे शिवप्रेमींनी गनिमी काव्याने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे, त्यानंतर पुतळ्याचा मुद्दा चिघळला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details