Chandrayaan 3 Mission : 'चांद्रयान -3 मोहीम सर्व पैलूंवर यशस्वी झाली पाहिजे' - चांद्रयान 3 अवकाशात
बंगळुरू/तिरुवनंतपुरम :चांद्रयान - 3 हे शुक्रवारी अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयान-3 मोहीम सर्व प्रकारे यशस्वी झाली पाहिजे, जेणेकरुन आपण अंतराळ क्षेत्रातील एक मोठा टप्पा पार करू शकू, अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ जी माधवन नायर यांनी दिली आहे. जी माधवन नायर यांनी गुरुवारी सांगितले की, चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान -3 मोहीम सर्व पैलूंवर यशस्वी झाली पाहिजे. जेणेकरून भारत अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा पार करू शकेल. चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट लँडिंग' हे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे असल्याचे नायर यांनी म्हटले आहे.
चांद्रयान 3 यशस्वी होणे गरजेचे -चांद्रयान - 3 मोहीम इस्रोसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. इस्रोने सुमारे चार वर्षांपूर्वी चांद्रयान-2 च्या 'सॉफ्ट लँडिंग' दरम्यान आलेल्या समस्यांपासून धडा घेत सध्याच्या मोहिमेमध्ये अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच सर्व यंत्रणा मजबूत केल्या आहेत. चांद्रयान - 3 ही मोहीम सर्व बाबतीत यशस्वी होणे गरजेचे असल्याचेही जी माधवन नायर यावेळी म्हणाले.