Chandrakant Khaire Warned Video : गद्दारांना माफी नाही; २७ तारखेनंतर रस्त्यावर उतरू - चंद्रकांत खैरेंचा इशारा - Chandrakant Khaire Warned Video
औरंगाबाद येथील युवा सेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आणि बंडखोर नेत्यांवर सडकून टीका केली. भाजपला आपले नेते उद्धव साहेब, युवा नेतृत्व आदित्य ठाकरे ( Youth Leader Aditya Thackeray ) हे नको आहेत, त्यामुळे त्यांनी हा डाव रचला असल्याचे त्यांनी सांगितले. सेनेच्या आमदारांनी गद्दारी केली तरी आपण गप्प का? हा प्रश्न पडलाय. मात्र, आता २७ तारखेनंतर आपण दाखवू असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena Leader Chandrakant Khaire ) यांनी युवासेनेच्या मेळाव्यात दिला. यांनी चित्रपट काढला त्यात काय होत गद्दारांना माफी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या वाढदिवसानंतर ( Uddhav Thackeray Birthday After ) आपण रस्त्यावर उतरू, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST