Chandrakant Khaire : मी होम हवन करतो, पहा मग तुमचे काय होईल, चंद्रकांत खैरेंचा सूचक इशारा - Eknath Shinde group
औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांनी अधात्माच्या जोरावर होम हवन करुन शिंदे गटाला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 29- 30 तारखेला सर्वोच्च न्यायालयात याचिका येणार आहे. त्यावेळी मी 27 तारखेला दक्षिण मुखी हनुमान मंदिरात होम हवन करणार आहे. मग बघा तुमची काय अवस्था होते, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. मी खोक्यांसाठी नाही, पक्षासाठी काम करतो. असे म्हणत खैरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST