महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nanded Crime: विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला गेलेल्या फोटोग्राफरच्या घरात दरोडा, चड्डी गँगचा कारनामा सीसीटीव्हीत कैद - Vitthal Darshan

🎬 Watch Now: Feature Video

चड्डी गँगची दहशत

By

Published : Jun 28, 2023, 7:37 AM IST

नांदेड : काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, दरोडे, मारामारी आणि चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहे. तर दुसरीकडे नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कौठा भागात चड्डी गँगने दहशत माजवली आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताचे घर फोडून चड्डी गँगने सोने-चांदीसह रोख रक्कम लंपास केली. सोमवारी रात्री जुना कौठा परिसरातील कपिलेश्वर नगर येथे ही घटना घडली. घरफोडी करणारे हे चोरटे परिसरातील एका सीसीटीव्ही कैमेरात कैद झाले आहेत. फोटोग्राफरच्या घरातून या चोरट्यांनी सोने चांदी रोख रक्कम असे जवळपास एक लाखाहून अधिक रुपयाचा ऐवज लंपास केला. यामुळे शहरात चडी गँगची दहशत पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details