Tulsi Vivah पुण्यात तुलसी विवाहाचा उत्साह.. जल्लोषात पार पडला विवाह सोहळा, पहा व्हिडीओ - with Manglashtakas in Pune
पुणे : शुभमंगल सावधानचे, मंगलाष्टकांचे सूर, राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह सोहळा Celebration of Sri Krishna Tulsi Vivah ceremony with Manglashtakas पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुळशी चरणी नतमस्तक होत, सुख-समृद्धी आणि आनंदी जीवनाचे मागणे मागत होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशीविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, गजानन धावडे, विजय चव्हाण, तानाजी शेजवळ, साखरे महाराज मठाचे वंदना मोडक, वनिता मोडक, सोनिया मोडक आदी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST