CCTV : अज्ञात गुंडाने पेटवल्या दुचाकी, आरोपीचा शोध सुरू - Nagpur
नागपूर - नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञाताने पार्किंगमध्ये उभी असलेल्या दुचाकींंना आग लावल्याची घटना घडली आहे. वाहनाला आग लावतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. जळालेली दोन्ही दुचाकी वाहने एका व्यापाऱ्याची आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने नागपुरात गुंडांवर कोणाचे वचक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात आरोपीने राजकुमार केवलरामानी शाळेजवळच्या पार्किंगमध्ये असलेल्या दोन दुचाकींवर ज्वलनशील द्रव्य टाकून त्या पेटवल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मागील सहा महिन्यात नागपुरात अनेकदा दुचाकी पेटवल्याच्या किंवा घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी फोडण्याच्या घटना घडल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST