महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Case Registered Against Rahul Gandhi : सावरकरांचा अपमान केल्याने राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल- शिंदे गटाचे प्रवक्ते - आमच्या भावना दुखावल्या

By

Published : Nov 18, 2022, 12:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ठाणे काळ्यापाण्याच्या शिक्षेतून आपली सुटका करून घेण्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर freedom fighter Savarkar यांनी अंदमान येथून ब्रिटिश सरकारला माफीनामा लिहीला होता. त्यात आपण काँग्रेस विरोधात मदत करणार असल्याचे विधान सावरकरांनी केले होते, असे राहुल गांधी यांनी केल्याने his statement against freedom fighter Savarkar महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वीर सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली व ते इंग्रजांकडून पेन्शन घेत होते असे विवादास्पद आणि अपमान जनक वक्तव्य केल्याने, सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या विरोधात एकवटले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष अनिता सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिसांनी स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन ठाणे नगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा case registered against Congress leader Rahul Gandhi दाखल केला आहे. अंदमान येथील तुरुंगात दोन जन्मठेपे भोगत असलेल्या सावरकरांनी एकूण 14 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली व त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. अशा महान क्रांतिकारकाचा राहुल गांधी यांनी अपमान केल्याने आपल्या भावना दुखावल्या मुळेच, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details