Anand Dave On Pradeep Kurulkar : 'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुलकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - आनंद दवे - हनीट्रॅप प्रकरण
पुणे :पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅप प्रकरणावरुन एटीएसने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्याला 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुलकर यांच्या अटकेबाबत हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, प्रदीप कुरुळकर यांच्या अटकेची बातमी ज्या दिवशी आली तो दिवस हिंदूंसाठी अत्यंत वाईट, दुःखाचा दिवस होता. जर केले असेल तर ते अत्यंत घृणास्पद आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये लष्करातील अधिकारी तसेच अधिकारी अडकले. नंतर त्यांची सुटका झाली. कुरुलकर यांच्या प्रकरणातही दिलासा मिळण्याची आशा आहे. मात्र, त्याच्याविरुद्ध पुरावे आढळल्यास त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे दवे म्हणाले.
हेही वाचा: