महाराष्ट्र

maharashtra

कारची महिलांना धडक

ETV Bharat / videos

Car Rammed Into Women : मॉर्निंग वॉक बेतला जिवावर, भरधाव कारने चिरडले..पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ - रंगारेड्डीमध्ये कारची 3 महिलांना धडक

By

Published : Jul 4, 2023, 9:43 PM IST

रंगारेड्डी - असे म्हणतात की, जीवनाचा काही भरवसा नाही. मृत्यू कधीही आणि कुठेही येऊ शकतो. याचा पुरावा नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून मिळतो. पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना कल्पनाही नसेल की हा मॉर्निंग वॉक त्यांच्या आयुष्यातील शेवटचा मॉर्निंग वॉक असेल. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील बंदलागुडा जागीर सन सिटीमध्ये मंगळवारी सकाळी घडलेली ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल. येथे तीन महिला परिसरातील रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असताना मागून येणाऱ्या एका अनियंत्रित कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतक्या वेगाने झाला की आजूबाजूच्या लोकांना काहीच समजले नाही. तिन्ही महिलांना धडकल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात धडकली. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. तर दोन महिला ठार झाल्या. अनुराधा (45) आणि ममता (26) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार कार चालकाचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details