Car Fall In Well: कार शिकवताना सुटलं नियंत्रण, कार थेट 70 फूट खोल विहीरीत! - कार शिकवताना सुटलं नियंत्रण
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी येथे भीषण अपघात झाला आहे. car accident in buldhana. अपघातापूर्वी पती आपल्या पत्नीला कार शिकवत होता. मात्र कार शिकवत असताना अचानक कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट विहीरीत कोसळली. Car Fall In Well. कार विहिरीत कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. घटनाग्रस्त कारमधील पतीला क्रेनच्या सहाय्याने वाचविण्यात यश आलं असून त्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं आहे. पतीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुलगी आणि पत्नीचा अद्याप शोध लागलेला नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST