महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये कार दुभाजकाला धडकवून विचित्र स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल - महागड्या वाहनांमध्ये स्टंटबाजी

By

Published : Jul 25, 2022, 2:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

सोलन - येथील एक स्टंटबाजीचा व्हिडओ सध्या व्हायरल होत आहे. काहींना महागड्या वाहनांचा छंद आणि महागड्या वाहनांमध्ये स्टंटबाजी करणे आवडते. पण कधी कधी हा स्टंट जीवन आणि मृत्यू यांच्यातील खेळ बनतो. असाच काहीसा प्रकार सोलन जिल्ह्यात घडल्याचे दिसते. येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Solan accident viral video). एक तरुण चालत्या वाहनाचा दरवाजा उघडून स्टंटबाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हाच स्टंट करताना नियंत्रण सुटल्याने कार सोलनमध्ये दुभाजकावर आदळली (Car collided with a divider in Solan). पाठीमागून गाडी चालवणारा चालक या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ फोनमध्ये रेकॉर्ड करत होता. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आजूबाजूने जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहा व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details