महाराष्ट्र

maharashtra

कार चालकाने दुचाकी नेली फरफटत

ETV Bharat / videos

Car bike Accident : कार चालकाने 3 किलोमीटरपर्यंत दुचाकी नेली फरफटत

By

Published : Aug 18, 2023, 12:05 PM IST

नागपूर : भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक देत दुचाकीला 3 किलोमीटर फरफटत नेल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली. अपघात झाल्यानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे कार चालकाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोन तरुण दुचाकीवरुन वर्धा मार्गाने एका हॉटेलकडे जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक झाल्यानंतरही कार चालक थांबला नाही. दुचाकीला जोरदार धडक लागल्यानंतर दुचाकीवरचे दोन्ही तरुण दूर फेकले  गेले. तर दुचाकी कारच्या समोरील भागात अडकली. तरीदेखील कार चालकाने कार न थांबवता 3 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने दुचाकीवरील दोन्ही तरुण सुखरुप आहेत. हिट अँड रनचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागले आहेत. वाहतूक पोलिसांनी यावर कठोर पावले उचलत कारवाई केली पाहिजे अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details