महाराष्ट्र

maharashtra

Buldhana Crime

ETV Bharat / videos

Buldhana Crime : घाटात नेऊन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न फसला... दोन होमगार्डसह तरुणी ठरल्या देवदूत - बुलढाणा शहर पोलीस ठाणे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 7:46 AM IST

बुलढाणा Buldhana Crime : अकोल्याहून बुलढाण्याला आणून राजूरच्या घाटात आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा पतीचा कट फसलाय. राजूरच्या घाटातील देवीच्या मंदिराजवळ पत्नीला मारत असताना पत्नीनं आरडाओरडा केल्यानं पोलीस चौकीवर उपस्थित असलेल्या दोन होमगार्ड आणि व्यायाम करणाऱ्या दोन युवतींच्या सतर्कतेमुळं महिलेचे प्राण वाचले. या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.  शेख इब्राहिम शेख चाँद असं त्याचं नाव आहे.  आरोपी शेख इब्राहिम शेख चांद यानं संशयातून पत्नीला फारकत देण्याचं ठरविलं. त्यानं कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ आणलं. त्यांनतर त्याठिकाणी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर पत्नी ओरडल्यानं परिसरात आवाज झाला. यावेळी दोन्ही होमगार्ड आणि तरुणींनी त्या महिलेचे प्राण वाचवले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानं बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास जयसिंग राजपूत हे करत आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details