Bus Accident at Rajur Ghat: ब्रेक फेल झाल्याने राजूर घाटात बस पलटली, ५५ प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण
बुलढाणा :राजुर घाटात एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने ही बस पुढील दरीत कोसळली नसल्याने मोठी जीवित हानी यावेळी टळली आहे. या बस अपघातात तब्बल 10 प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना मुक्का मार लागला आहे. तब्बल 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अनेक विद्यार्थी देखील प्रवास करत होते. बसमधील प्रवाशांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने बसचे काच फोडून बाहेर काढण्यात आल आहे. सर्व जखमींना बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल आहे. चालक वाहकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला आहे. खामगाव आगारातून सप्तशृंगीकडे जाणाऱ्या बसचे मलकापूर शहरातील महावीर चौकात ब्रेक निकामी झाले होते. बस थांबली नसल्याने चालक अमोल केणेकर यांनी तातडीने वाहक कमल वाघ यांना सांगितले. वाहकाने तातडीने चालत्या गाडीतून खाली उडी घेतली. तसेच बसच्या पुढील चाकासमोर मोठा दगड ठेवला. त्यामुळे बस थांबली. बसमधील पस्तीस प्रवासी खाली उतरले. चालक आणि घटनेची माहिती मलकापूर आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांना दिली. बसची दुरुस्ती करून आगारात आणण्यात आली.