महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video धोकादायक इमारत पाडताना झाला अपघात.. कारवर पडला इमारतीचा भाग, पाहा व्हिडिओ - building collapsed in borivali while demolition

By

Published : Oct 28, 2022, 5:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

मुंबई बोरिवलीतील वझिरा नाका vazira naka येथील एका धोकादायक इमारतीला पाडण्याचे काम सुरू असताना त्या इमारतीचा काही भाग कोसळला. building collasped in borivali. इमारत आधीच खाली केली असल्याने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर ढिगारा कोसळल्याने चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथील वझिरा नाका आनंद शाळेजवळ कमला रेसिडेन्सी ही चार मजली इमारत आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधली जाणार होती. इमारत पाडण्याचे काम सुरू असताना आज दुपारी १ च्या सुमारास काही भाग कोसळला. घटनेनंतर अग्निशमन दल, पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details