Opposition Protested Against Government : 'बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...' अश्या आगळ्यावेगळ्या घोषणांनी विधान भवन दणाणले - Mahavikas Aghadi is unhappy with government budget
मुंबई : खोदा पहाड, निकला चुहा... शेतकऱ्यांवर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो... बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या अकराव्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनाच्या पायर्यांवर उतरत आमदारांनी निषेध नोंदवला. सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ घोषणा आहेत, असे म्हणत विरोधक यावरून चांगलेच आक्रमक झाले. 'खोदा पहाड, निकला चुहा... बजेटचा डोंगर, निघाला उंदीर... शेतकऱ्यांचे वीज कापणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा दिल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले आहे. या दरम्यान अनेक विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.