Youth Murder Case Nanded: मेहुणीच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून प्रियकराची निर्घृण हत्या - brutal murder of lover due to love affair
नांदेड :मेहुणीच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून किरण माने या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना 17 जुलै रोजी रात्री उशिरा रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरण माने नावाच्या तरुणाचे त्याच परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणावरून किरण माने आणि शिवा माने यांच्यात अनेकदा वाद झाले. वारंवार विनंती करूनही किरण मानेचे प्रेम प्रकरण संपत नसल्याने शिवा माने व त्याच्या मित्रांनी किरणच्या हत्येचा कट रचला. शिवा माने, अविनाश नांदणे आदींनी 17 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास किरण मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर तत्काळ कारवाई करत इतवारा पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. इतवारा पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नांदेड शहरात पुन्हा एकदा खळबळीचे वातावरण आहे. बाकीच्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी शिवा माने आणि किरण माने हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे.