Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील लोकांच्या दुःखात बीआरएस त्यांच्या सोबत-बाळासाहेब सानप - इर्शाळवाडीत बचावकार्य सुरुच
रायगड : इर्शाळवाडीत भूस्खलन झाल्याने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. आजही एनडीआरएफकडून बचावकार्य सुरुच आहे. बचाव कार्य करताना आणखी दोन महिलांचे आणि इतर तीन असे एकूण पाच मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढतच आहे. विविध संस्था संघटनेच्या वतीने तेथील लोकांना मदत केली जात आहे. आज भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे राज्याचे नेते बाळासाहेब सानप यांनीदेखील घटना स्थळी भेट दिली. येथील नागरिकांना मदतीसह त्या लोकांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे. तसेच या लोकांच्या दुःखात आम्ही सहभागी असून पक्षाच्या वतीने योग्य ती मदत करण्यात येणार आहे. असे सानप म्हणाले. तर 2015 पासून या भागातील नागरिक हे पुनर्वसनासाठी सरकार दरबारी जात आहे. मात्र त्यांना फक्त आणि फक्त आश्वासन मिळाले. सरकारच्या या आश्वासनांचा बक्षीस या लोकांना अशा पद्धतीने मिळाले आहे. पण आता भारत राष्ट्र समिती या आदिवासी लोकांच्या बरोबर असून या लोकांना न्याय मिळवून देणार आहे.